शेती व पशुपालन

     जमीन तयार करणे 

उद्देश्य :- जमीन  तयार  करणे 
              जमीन तयार  करणे म्हणजे जमीन पिकाच्या लागवडी योग्य करने किंवा जमीन भुसभुशीत करने होय.


साहित्य व् साधने :- टिकाव , फावड़े ,घमेले , दाताळे इत्यादि साधनांच वापर केला .

कृति :- दगड , गोटे ,  बारीक  माती , व  वाळू  तसेच  इतर  कार्बनी  पदार्थ  मिळून  माती  तयार  होते . जमीन  खणल्यानंतर  मातीचे  थर  संपल्यानंतर  त्याखाली  खडक  लागतात . नदी , पावसाचे  पाणी , वाहणारे  वारे  आणि  हवामानात  सतत  होणारे  बदल  यांमुळे  खडक  आणि  शिलाखंड  फुटतात . झीज  होऊन  कालांतराने  त्याचे  बारीक  कणांमध्ये  रुपांतर  होते नाणी  त्याची  माती  होते . खडकाचे  मातीत  रुपांतर  होणे , या  क्रियेला  खडकांचे  अपक्षीणन  म्हणतात .


सुपीक  जमिनीला  २.५  सेंमी  जाडीचा  मातीचा  थर  नौसर्गीकरित्या  तयार  होण्यास  ८००  ते  १०००  वर्षे  लागतात 


जमिनीचे / मातीचे  महत्व :- १ माती  वनस्पतींना  आधार  देते . 

                                        २  वनस्पतींच्या  वाढीसाठी  आवश्यक  असणारी  विविध  खनिजे , अन्नद्रव्य मातीतून  मिळतात .

३  वनस्पतींच्या  वाढीसाठी  आवश्यक  पाणी  माती  साठवून  ठेवते  तसेच  माती  हि  वनस्पतींच्या  वाढीसाठी  आवश्यक  असणारे विविध  सुश्मजीवांचे  घर  असते .


भारत  हा देश  भौगोलिकदृष्ट्या  वेगला  विविध  असल्याने  प्रत्येक  भागातील  जमीन  हि  वेगवेगळी  असते . 

जमिनीचे  सुपीकते  नुसार  प्रकार :- १ गाळाची  मृदा  २  तांबडी  मृदा   ३   काळी  मृदा  ४  वालुकामय  मृदा  ५  जांभी  मृदा  ६  खडकाळ  मृदा  इत्यादी  जमिनीचे  प्रकार  आहेत .
* जमिनीमध्ये 45% माती आहे 25% हवा तेथे 25% पाणी आणि सेंद्रीय संयुगे 5% आहे. * वाळूच्या लहान तुकड्यांमुळे वाळू तयार होतो * अतिमहत्वाचे घटक म्हणजे एन.पी.के. प्राथमिक घटक नाइट्रोजन - वाढ फॉस्फोरस- ताकद पोटॅशिअम - फोटॉयनिथिस
हे महत्त्वाचे का आहे? निरोगी रोपांची वाढ, मानवी पोषण, पर्यावरणातील सेवा जसे की पाणी छाननी करणारी आणि दुष्काळ, पूर किंवा अग्नीच्या प्रभावांना अधिक संवेदनक्षम असलेल्या लँडस्केपसाठी स्वस्थ मातीत आवश्यक आहे. निरोगी मातीमुळे पृथ्वीचे हवामान नियंत्रित होते आणि जगभरातील सर्व जंगलांच्या तुलनेत अधिक कार्बन साठवून ठेवण्यात मदत होते. निरोगी मातीत आपल्या अस्तित्वासाठी मूलभूत आहेत लाल माती - लाल माती म्हणजे एक प्रकारचा माती जो उबदार, समशीतोष्ण आणि ओलसर वातावरणामध्ये पर्णपाती किंवा मिश्रित वनक्षेत्रात विकसित होते, ज्यात पातळ कार्बनी आणि सेंद्रिय-खनिज थर असतात जे पिवळ्या-तपकिरी भागावर बांधलेले एक ओलसर लाल थर वर विश्रांती घेतात. लाल माती साधारणपणे स्फटिकासारखे रॉकपासून बनविली जाते. काळे माती - ब्लॅक माती याचा संदर्भ घेऊ शकते: Chernozem, पूर्वेकडील युरोप, रशिया, भारत आणि कॅनेडियन प्रॅरीजमध्ये आढळणा-या सुपीक काळा मातीत; घाण (माती), मुख्यतः बुरशी पाण्यातून निचरा केलेल्या swampland पासून तयार केलेली माती; व्हर्टिसोल, गडद क्रॅकिंग माती, ज्यामध्ये उच्च मातीची रचना आहे जिथे विषुववृत्त 50 ° N आणि 45 ° S दरम्यान आढळते; टेरा प्रीता, "काळी पृथ्वी" किंवा माती ...


                                    अझोला बेड तयार करणे

उद्देश :- पशूपालनासाठी अॅझोला महत्त्वाचा आहे , त्यासाठी  अॅझोलाचे उत्पादन घेणे .
साहीत्य :- फावड , घमिले ,टिकाव , खुरपे .
साधन :-प्लास्टीक पेपर , विटा , मीटर ,टेप ,शेद्नेट , बादली .
रसायन :- SSP (sigal super prasspet ) खत ,मिनरल मीक्चर , शेन , माती .
क्रती :- १) प्रथम बेडचे   साहीत्य , साधने घेतले त्यानतर जमिनीचे मोजमाप केले, अझोला साठी लागणारे क्षेत्र 
                काढले    
            2) ठरवलेल्या मापानूसार  जमीनेवर १ फूट खोल असावीर प्लास्टीक पेपर आतरून घ्यावे , असे एकून                   ५ बेड तयार झाले .फक्त एक दशता घ्यावी प्लास्टीक पेपर लीकेज नको
            ३) त्यानटर बेड सूत्रानुसार खताचे प्रमाण घ्यावे
            १} मिनरल मीक्चर = २७० `ग्रम
            २}SSP (sigal super prasspet ) खत = २७० ग्रम
            ३}शेन = २७ किलो
            ४}माती = २७ किलो
            ५)  आता प्रत्यक बेड वर माती चाळून व पसूरून
            ६) प्रत्यक बेड मधी  पाणी सोडले
             ७) शेणात पाणी घालून त्याच्यातील घाण काढून   त्याच्या स्लरी तयार केली
             ८) पाण्यामध्ये "SSP" खत मिसळून दिले
             ९)  त्यांनतर मिनरल मीक्चर सोडले व दीड किलो अझोला सोडला
निरीक्षण :- 1) अझोला ची वाढ लवकर होते
                  2)सावलीत असल्यामुळे तो हिरवा दिसतो 

अनुमान :-१) प्रती गादी दोन वेळा पाणी देवून आठवड्यात ॲझोला गादी पूर्ण भरते.
                २) ॲझोला काढल्यास दोन-तीन दिवसात परत उगवतो.
ॲझोलाचे फायदे
१) पशुखाद्याच्या खर्चात १५ ते २० टक्क्याची बचत
२) जनावरांत गुणवत्ता वृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते ,आरोग्य सुधारून आयुष्य वाढते .
३) ॲझोलाच्या वापरामुळे फॅट ,दुध व वजनात वाढ
४) पक्षी (बदक, इमू, लव्ही, आदि) खाद्यात मिश्रणस्वरुपात ॲझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबडयांच्या वजनात वाढ
५) अंडी देण्याच्या प्रमाण वाढ, तसेच अंड्याच्या पृष्ठभाग चकचकीत होतो.
६) ॲझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खजिनयुक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी वापरात येते.

                               मूरघास तयार करणे 
 मूरघासाच्या खड्ड्याची रचना, आकार व बांधणीची पद्धत हि त्या ठीकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी व जनावरांची संख्या यावर अवलंबून असते.
 खड्डा बनविताना तो जास्तीत जास्त ऊंच जागेवर करावा. म्हणजे पावसाचे पाणी त्यात झिरपणार नाही.
 चौरस खड्डा असल्यास कोपऱ्याच्या जागेत हवा राहण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी खड्ड्याचे कोपरे गोलाकार असावेत.
 खड्ड्याच्या भिंती हवाबंद आहेत कि नाहीत याची खात्री करावी. भितींना छिद्रे किंवा भेगा नसाव्यात यासाठी भिंतींना सिमेंटने गुळगुळीत प्लास्टर करावे.
 खड्ड्याची खोली हि त्या भागातील जमिनीतील पाण्याच्या पातळीवर अवलंबून आहे. जेथे पाण्याची पातळी वर आहे, तेथे जमिनीवर टाकी बांधावी व जेथे पाण्याची पातळी खोल आहे, तेथे जमिनीत खड्डा घेऊन तो बांधून काढणे सोयीस्कर व फायद्याचे आहे.
 खड्डा खोदून बांधकाम, प्लास्टर करण्यास जास्त खर्च होत असल्यास, खड्डा खोदल्यानंतर निळ्या रंगाचा २०० मायक्रॉनचा पेपर वापरावा.
 मूरघासाचे फायदे:
१. मूरघास जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे.
२. मूरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा कमीत कमी जागा लागते. म्हणजे एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मूरघासाच्या स्वरुपात ५०० किलो चारा ठेवता येतो.
३. दररोज चारा कापून जनावरांना खाऊ घालण्यापेक्षा त्याचा मूरघास बनवल्यास चारा पिकाखालची जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पीक त्वरित घेता येते. म्हणजेच आपल्याला जास्त पिके घेता येतात व रोज चारा कापून खाऊ घालण्यामागील कष्ट व वेळ वाचतो.
 मूरघासाची प्रत :
 बुरशी: मूरघास व्यवस्थित दाबला नाही तर त्यात बुरशीची वाढ होते.
 वास: चांगल्या मूरघासाला आंबट-गोड वास येतो.
 रंग: चांगल्या मूरघासाचा रंग फिक्कट हिरवा किंवा तपकिरी असतो. कुजलेल्या मूरघासाचा रंग काळा असतो.


 सामू: चांगल्या मूरघासाचा सामू (पीएच) ३.५ ते ४.२ असतो.                                 

                    बीज  प्रक्रिया  करणे  


साहित्य :- बियाणे , बुरशीजन्य  अौषध , अॅझोटोबॅ कटर  , रायझोबियम  , गुळ , इत्यादी 

साधने :-  घमेले , बादली , फावडे  , ताड पत्री , हँन्डग्लोज  इत्यादी 


कृती :- १ सुरवातीस  बिया  घमेल्यात  घ्या .

२  हातात  हातमोजे  घालून  बियांवर  ५% गुळाचे  पाणी  शिंपडा .

३  त्यात  नंतर  बुरशी  नाशके , संजीवके , सल्फर  इत्यादी   अौषध  योग्य  प्रमाणात  टाकली .बियाणे  थोडा  वेळ  सावलीत  वाळण्यास  ठेवली. 


बीज  प्रक्रियेचे  फायदे :- १  बियांची  उगवण  क्षमता  वाढते .

२  रोपांची  किवा  पिकांची  रोग  प्रतिकार  क्षमता  वाढते .

३  पिकाच्या  उत्पनात  वाढ  होते .  

४  रोपे  मरण्याचे  प्रमाण  कमी  होते .बीज  प्रक्रिया  करण्याच्या  पद्धती :- १  बटाटे  बियाणे  जिब्रेलिक  अॅसिडमध्ये  भिजवून  लावल्यास  लवकर  व  चागल्या  दर्जाचे  उगवण  होते .
२  उसाचे  बी  जिब्रेलिक  अॅसिडमध्ये   भिजवून  लावल्यास  लवकर  व  चागल्या  दर्जाचे  उगवण  होते .

३  कांद्याची  रोपे  लावण्या पूर्वी  इथरेल  द्रावणात  घालून  लावल्यास   मर  कमी  होते .


बीज  प्रक्रिया  पद्धती :- १  बी  गरम  पाण्यात  भिजत  ठेवणे .

२  बी  थंड  पाण्यात  भिजत  ठेवणे .

३  बी  कठीण  पृष्ठ  भागावर  घासणे .

४   कोरड्या  बियांना  अौषध   लावणे .

५  रोपांची  मुळे  द्रावणात  भिजत  ठेवणे .


जमीन  तयार  करून  जे  पिक  जमिनीत  घ्यावयाचे  असते  त्यावर  बीजप्रक्रिया  करून  लागवडी  योग्य  केल्या  नंतर  त्याची  लागवड  कोणत्या  पद्धतीने  करावयाची  हर  ठरविले  जाते .


लागवड  करण्याच्या  पद्धती :- १  टोकन  पद्धत 
२  पेरणी  पद्धत 
३ फोकन  पद्धत 


               जमिनीचे  मोजमाप  करणे 


साहित्य :- वही , पेन , मीटर  टेप ,गणकयंत्र , खुणा  करण्यासाठी  साहित्य   इत्यादी   


कृती :- १  प्रथमता  जमीन  मोजण्यासाठी  मी  किचनच्या  मागचा  अॅझोलाचा  बेड  निवडला .

२  तो प्लॉट  सपाट  होता .

३  त्या  प्लॉट ला  ४  बाजू  होत्या , त्या बाजू समान  होत्या .

४  प्रथम  आम्ही  त्या प्लॉट च्या  बाजूंना  नावे  दिली .

५  त्यानंतर  त्या  प्लॉटच्या  बाजूंची  मापे  घेतली .

६  त्या  मोज  मापाना  नावे  दिली  a , b , c , d  नावे  दिली .

AB - पूर्वेकडील  अंतर 
BC - दक्षिणेकडील  अंतर 
CD - पश्चिमेकडील  अंतर 
DA - उत्तरेकडील  अंतर अॅझोलाच्या  ४  बाजूंची  नावे :-

ab -२६ फुट 
bc -२३  फुट 
cd -२६ फुट 
da -२३  फुट 

अॅझोला  बेडचे  स्क्वेअर  फुटामध्ये  = ५९८  


अॅझोला  बेडचे  स्क्वेअर  मीटरमध्ये = १८१.२१ 

१  फुटाचे  मीटरमध्ये  रुपांतर  करायचे  तर  ३.३  ने भागणे .

२  मीटरचे  फुटात  रुपांतर  करायचे  असेल तर ३.३  ने गुणणे .

३  cm  चे  रुपांतर  इंचात  करायचे  असेल  तर २.५  भागणे .

४  इंचाचे  रुपांतर  cm मध्ये  करताना  २.५  गुणणे .


              साहित्य  व  साधनांची  ओळख 
                                                      

१  खुरपे :-  आपल्याला  पिकामधील   गवत  मुळापासून  काढण्यासाठी  कठीण  जाते , ते  खुरप्यापासून  सोप्या  पद्धतीने  काढता  येते .  २ फावडे  ( खोरे )   :-   हे  माती  ओढण्यासाठी  किंवा  माती   घमेल्यात   भरण्यासाठी  याचा  उपयोग  होतो . किंवा  शेतात पाणी  देण्यासाठी   म्हणजे  दारे  काढण्यासाठी  त्याचा  वापर  होतो .


३  टिकाव :-  याचा  उपयोग  खोदण्यासाठी  तसेच  खड्डा  करण्यासाठी   केला  जातो .


४  विळा :-  विळ्याचा  उपयोग  हत्ती गवत   कापण्यासाठी , मका कापण्यासाठी  होतो .


५  घमेले :-   याचा  वापर  माती  व खते  एका    जागेवरून  दुसरीकडे  नेण्यासाठी   होतो .


६  नांगर :-  जमीन  खोलवर  नांगरण्यासाठी  याचा  वापर  होतो .

७    पहार :-  पहारिचा  उपयोग  खड्डा  खोदण्यासाठी  होतो .


८   दाताळे  :-  शेतात  बी  टाकल्या  नंतर  त्यावर     दाताळे  फिरवले  तर  ते  बी  जमिनीमध्ये  आत  जाते  .[उदा .  भाजीपाला  वर्गीय  पिके ]

9  रोटर :- खालची  माती   वर  व  वरची  माती  खाली  करण्यासाठी  , खत  मिक्स  करण्यासाठी  याचा  वापर   होतो .

१०  दोरी :-  या  दोरीचा  उपयोग   पाण्यात  मोटर  सोडण्यासाठी  व  विहिरीतून  वर  काढण्यासाठी  होतो .

११ स्प्रे  पंप [बॅटरी   पंप ]:-  याचा  वापर  अौषध  फवारणीसाठी  केला  जातो .  

१२  कोळपे :-[फटीचे  कोळपे व  बिना  फटीचे  कोळपे ] आपल्या  जमिनीतील  गवत  काढण्यासाठी  याचा  वापर  होतो 

१३ कोयता :- अनावश्यक   झाडे - झुडपे  तोडण्यासाठी .

१४  फावडी:- फावडीचा  वापर  सारे  पडण्यासाठी  केला  जातो .

१५   सी  कटर :- सी  कटरचा  वापर  छोट्या  झाडांच्या  अनावश्यक  फांद्या  तोडण्यासाठी  होतो .  जनावरांच्या  दातावरून  अंदाजे  वय  ओळखणे 

उद्देश :- दातांवरून  जनावरांचे  अंदाजे  वय  काढणे .

प्राणी :- गाय ,बैल , वासरू ,शेळी  इत्यादी .

कृती:- १ . प्रथम  एका  जनावराच्या  जबड्यातील  दात  किती  आहेत  हे  पाहण्यासाठी  जनावराचा  जबडा  उघडा .
२ .जबड्यामध्ये  दिसणाऱ्या  दातांचे  व्यवस्थित  निरीक्षण  करा .
३ .निरीक्षण  करताना  दुधाचे  किती  व  कायमचे  दात  किती  आहेत , याची  व्यवस्थित  पाहणी  करणे .
४ .वरील  पाहणीनुसार  वहीमध्ये  जबड्यातील  दात  दर्शवणारी  आकृती  काढली .( आम्ही  गोठ्यातील  गाईचे  व  शेळीच्या  पिलांचे  दात  चेक  केले ) 
५ . आकृतीचे  निट  निरीक्षण  करून  जनावराच्या  वयाच्या  बरोबर  अंदाज  केला .


दक्षता :- १ . जनावरांचे  दात  पाहताना  आपला  हात  चावला  जाणार  नाही ,याची  योग्यती  काळजी  घ्या .
२ .अनोळखी  जनावर  असल्यास  दात  पाहताना  संबधीत  मालकाची  मदत  घ्यावी  अन्यथा  जनावरांकडून  इजा  होण्याची  शक्यता  असते .


*  शिंगाच्या  वलयावरून  अंदाजे  जनावरांचे  वय  ओळखणे :-

    सूत्र :- वय =N +2 (N =शिगांच्या  वलयाची  संख्या )

उदा :- एका  जनावरांच्या  शिगांची  वलयांची संख्या  ५  आहे . तर  त्याचे  वय  किती? [पहिले  वलय २  वर्षांनी  येते ]
: गाईचे  वय = N +२  
             ५+२ = ७ वर्षे 

शेळी :- १ . शेळीचे  वयही  दातांवरून  अंदाजे  ओळखले  जाते .

२ . शेळीचे  उत्पन्न  ३ ते ४  वर्ष  चांगले  मिळते .

३ . शेळीचा  गर्भ  धारणेचा  कालावधी  ७  महिने  इतका  असतो .


                      पाणी  देण्याच्या  पद्धती 

* उद्देश :- पाणी  देण्याच्या  पद्धती  शिकणे .

* पाणी  देण्याच्या  दोन  पद्धती  आहेत 
१ पारंपारिक  पद्धती :- १ मोकाट 
                             २ सपाट  वाफा 
                              ३ सरी वरंबा 
                              ४ नागमोडी  वाफा 

२ अपारंपरिक  पद्धती :-१ ठिबक  पद्धत 
                                   २ स्पिक्लर  पद्धत 

 पारंपारिक  पद्धती:- 

१. मोकाट :- मोकाट  पाणी  पद्धती मध्ये  आपण  शेतात  वरंबे  किंवा  सऱ्या  न करता  पिकला  पाणी  देतो .उदा . ज्वारी  किंवा  अन्य  पिके .

आपण  शेतात  मोकाट  पाणी  सोडतो  त्यामुळे  आपल्या  पिकाची  मुळे  हि  जमिनीवर  ज्यास्त  खोल  गेलेली  नसतात . जमिनीत  ज्यास्त  पाणी  मुरल्याने  पाणी  ज्यास्त  खाली  जाते . त्यामुळे  पिकला  आवश्यक  तेवढे  पाणी  मुळे  खेचतात  व बाकी  पाणी  वाया  जाते , तसेच  आपण  पाण्यातून  सोडलेली  खते  ,अौषधेही  पाण्याबरोबर  जमिनीत  मुरली  जातात .  त्यामुळे  पिकला  योग्य  पोषक  खते  मिळत  नाही यामुळे  या  पद्धतीत  फायदे  कमी  व  तोटे  ज्यास्त  आहेत .


२  सपाट  वाफा :-  सपाट  वाफा  हि  पाणी  देण्याची  दुसरी  पद्धत आहे  . 
 सपाट  वाफा पद्धती  म्हणजे  ज्याप्रकारे  आपण   सपाट वाफ्यावर  मेथी  लावतो  व  तिला  पाणी  घालतो  ती  पद्धती  होय .


३ सरी वरंबा  पद्धती :- सरी वरंबा  पद्धती  हि  पाणी  देण्याची  पारंपारिक पद्धत  आहे [ तिसरी ].
  मका  लावण्यासाठी  ज्या  पद्धतीच्या  सऱ्या  करतो  व  कडेला  मक्याचे  बी  लावतो  व  सरीने  पाणी  सोडतो  या  पद्धतीस  श्री  वरंबा  पद्धत  म्हणतात .


४  नागमोडी  वाफा :-  पारंपारिक पद्धतीतील पाणी  देण्याची  हि  चवथी  पद्धत  आहे .यामध्ये  एका  पाठोपाट  एक  वाफे  असतात . एक  वाफा  भरलाकि  दुसरा  व  दुसरा  भरलाकि  तिसरा  अशा  प्रकारे  सगळे  वाफे  भरले  जातात . हि  पाणी  देण्याची  वाकडी  पद्धत  असल्यामुळे  या  पद्धतीला  नागमोडी  पद्धत  म्हणतात . अपारंपरिक  पद्धती:- 

१  ठिबक  पद्धत :- या  पद्धती मध्ये  गुंतवणूक  ज्यास्त  असते . पण  फायदेही  असतात . म्हणजे   या  पद्धतीत  तोटे  कमी  व  फायदे  ज्यास्त  असतात .
              या  पद्धती मध्ये  पिकाच्या  मुळाशी  पाणी  पडते  त्यामुळे  पाण्याचा  अति  वापर  म्हणजे  पाणी  वाया  जात  नाही .

फायदे :१ -  कमी  पाणी  लागते .

२  या  पद्धतीमुळे  पिकला  योग्य  प्रमाणात खते  देता  येतात . 
३   या  पद्धतीमध्ये  आपण  पिकला  किती  पाणी  दिले  याचे मापन  करता  येते .
४  या  पद्धती  मुळे  पिक  जोमदार  येते .


२   स्पिक्लर  पद्धत :- या  पद्धतीत  पिकावर  पाणी  शिंमपडून  टाकले  जाते . त्यामुळे  शेतात  सरी  किंवा  वरंबे  करण्याची  गरज  नसते .
त्यामुळे  टॅ्कटर खच्र कमी  होतो .स्पिक्लर  पद्धतीत  मध्ये   स्पिक्लरचे  विविध  प्रकार  आहेत .
उदा : भुईमुग , गवत  यांसारख्या  विविध  पिकांसाठी  या  पद्धतीचा  वापर  केला  जातो .


* निरीक्षण :- पानिदेण्याच्या  विविध  पद्धती  आहेत . त्यापेकी  काही  पद्धती  फायद्याच्या  आहेत  तर  काही  तोट्याच्या  आहेत . तर  काही  पद्धती  खर्चिक  आहेत  पण  फायद्याच्या  आहेत .


* अनुमान :- पाणी  देण्याच्या  पारंपारिक  पद्धती  ह्या  परंपरागत  चालत  आल्या  आहेत .
पाणी  देण्याच्या  अपारंपरिक  पद्धती स्पिक्लर  पद्धत  व  ठिबक  पद्धत ह्यांचा  शोध  उशिरा  लागला या  पद्धती खर्चिक  आहेत  पण  फायद्याच्या  आहेत .                  माती परीक्षण  करणे .

* उद्देश :- माती  परीक्षण  शिकणे .

* साहित्य व साधने :- खोरे , कुदळ , टिकाव , पिशवी , पेपर , घमेले  इत्यादी 


कृती :- १  आम्ही  ओट्सच्या शेतात  जाऊन  तिथे  सरांनी  सागीतल्या प्रमाणे  झीकझ्याक 6खड्डे  खोदले . [ त्यात  २  इंच वरची  माती  घेतली  नाही ]
२ ते  खड्डे  V  आकाराचे  होते .
३ त्यातून  १ kg  माती  काढली  प्रतेकाने  काढली . 
४ ती  एकञ  करून  तिचे  ४ भाग  करून  त्यातले  २  भाग  घ्यायचे  व २  सोडून  द्यायचे  असे  करून  अर्धा  किलो  माती  होइस  पर्यंत  केले . 
५ नंतर  ती  माती  सॉईल  टेस्टिंगला  नेहली . 
६ त्या  मातीच्या  ५  टेस्ट  केल्या  त्या  पुढील  प्रमाणे :- 

 १ PH [बॉटल  नं  १]:- न्यूट्रल . 

२ नायट्रोजन :- १४० अं  कमी .

३ फॉस्परस :- १४ लो . 

४ OC  सेंद्रीय  कर्रब :-

५ प्रोट्याशिअम :-

 हे  आम्ही  सॉईल  टेस्टिंग  ल्याब  मध्ये  चेक  केले .                          कलम  करणे 


उद्देश :-  कलम  करायला  शिकणे . 

साहित्य :- कलम  चाकू , सी  कटर , प्ल्यास्टीक पट्टी , स्प्याग्नम  मॉस ,/नारळाच्या  शेंड्या इत्यादी . 

कलमाचे  प्रकार :- १ भेट  कलम 
 २ डोळा  भरणे 
 ३ गुटी  कलम 
४ छाट  कलम 
५ पाचर  कलम 
६ दाब  कलम 

* हे  कलम  कोणकोणत्या झाडांवर  केले  जातात :- 
  १ भेट  कलम :- आंबा , चिक्कू , पेरू इ . 
  २ डोळा  भरणे :- संत्रा , मोसंबी इ . 
  ३ गुटी  कलम :- डाळिंब , पेरू इ . 
  ४ छ्याट  कलम :- डाळिंब , द्राक्ष , अंजीर इ . 
  ५ पाचर  कलम :- आंबा , द्राक्ष इ . 
  ६ दाब  कलम :- पेरू इ . 

अश्या  प्रकारे  वेगवेगळ्या  झाडावर  वेगवेगळी  कलम  केली  जातात . 

* झाडांची  संख्या  वाढवण्यासाठी  कलमे  केली  जातात  
    Image result for tree kalam bhet kalam                                 


Image result for tree kalam guti kalam Related image

https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQl7bPRCB-q_LENyzdVFI5w83d8HhaMiXitGawje1hCCaAWErnN 


Image result for tree kalam

                 जिवामृत तयार करणे
साहित्य /साधने :- बॅरल,बकेट,लाकडी काठी,गुळ,शेण,ताक/दही,पाणी,बेसन पीट,गौमुत्र,
कृती :- सुरुवातीला १५० लीटर चा बॅरल घेतला .त्यामध्ये पाणी भरून घेतले .त्यानंतर बकेट व गोमुत्र याचे मिश्रण सेप्रेट बकेटमध्ये तयार केले .त्यानंतर तयार केले सर्व मिश्रण बॅरल मध्ये टाकले नंतर बॅरलमध्ये टेवलेले मिश्रण हालवण्यासाठी काटीच्या सहाय्याने हलवले
नंतर बॅरल सावली आहे त्या टिकाणी ठेवून दिले .जिवामृत तयार होण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात या दिवसामध्ये दररोज तीन वेळा त्याला ठवळुन घेतले
७ व्या दिवशी जिवामृत तयार होते
त्यानंतर तयार झालेल्या जिवामृतामध्ये दुप्पट पाणी ओतले.
जिवामृत ड्रिपणे देण्यासाठी एका फडक्याने त्याला गाळुन घेतले व मग पिकाला दिले .
यामध्ये टूायकोडर्मा व अॅझटोबेकटर पण टाकु शकतो ते २०० लीटर पाण्यात २०० ते २५० ग्रॅम  म्हाणजेच १ लीटरसाठी १ ग्रॅम टाकु शकतो .
फायदे:-सोलण्युबल खत आणि औषध म्हणून उपयोग होतो .पिकाची वाढ चागली होती .

 

5.       जनावरांच्या शरीराचा मापावरून                                   अंदाजे वजन काढणे.
उद्देश:- जनावरांचे अंदाजे वजन काढणे.
साहित्य व साधने:- मीटर टेप, वही, पेन.
कृती:- वजन घेताना :- १) दोन शिंगांच्या मध्यातून व                        माकड हाडापर्यत घेणे.
                  २)छाती चा घेर(सेंटीमीटर मध्ये)
   १) अ  = छातीचा घेर 120cm
२) ब  = शिंगांच्या मध्यातून माकडहाडापर्यत 113cm
                ३) सूत्र = अ x अ x ब
           10400
      = 120 x 120 x 113 
             10400
     =      156kg
निरीक्षण :- १) जनावरांचे वजन वजन काठवर न काढता त्यांच्या मापावरून त्यांचे वजन काढणे.

     

दुधातील फॅट मोजणे .

उद्देश :-दुधातील भेसळ ओळखणे.

साहित्ये व साधने :-१ लीटर धुदाचे भांडे ,लाक्टोमीटर ,ता ट ई .

कृती :-हल्ली दुधात भेसळ  केली जाते .ति ओळखण्यसाठी लाक्टोमीटरचा  वाफर केला जातो

भेसळीचे प्रकार :- युरिया ,मीठ ,साखर ,पाणी .लाक्टमिटर हा भिंगवून टाकावा .भेसळ चेक कार्तानी साधारणता १ लीटर दुध  घ्यावे .लाक्टमितर फॅट  चा असावा .
निरिक्षन :-दुधात होणारी भेसळ लक्ष्यत येणे .काय टाकले ते ओळखणे . 

               जनावरांचे तापमान मोजणे.

Ø उद्देश :- जनावरांचे तापमान मोजणे.
Ø साहित्य व साधने :- थार्मामिटर, घड्याळ , वही , पेन
Ø कृती :- थार्मामिटर मधील वर चढलेला पारा हाताने
       झटकून शून्यावरती आणला. तापमान मोजताना       थार्मामिटर चा पार्याचा बल्ब सर्व बाजूनी त्वचेचा संपर्कात येईल असा धरावा. तो थार्मामिटर त्याजागी एक ते दोन मिनिट तसाच धरून ठेवावा. त्यानंतर तो थार्मामिटर बाहेर काढून त्यावरील रीडिंग वाचून वहीत नोंद केली. व गाईचे तापमान हे त्याचा गुदद्वाराद्वारे व शेणात मोजले जाते. गाईचे तापमान 101 फॅरानाईट ते 101.5 फॅरानाईट पर्यंत असल्यास ते नॉर्मल तापमान असते. त्या पेक्षा जास्त असल्यास गाईचा तब्बेतीत काहीतरी फरक आहे. व ती चारा खात नाही हे समजून येते.
Ø जनावरांचे सर्वसाधारण तापमान

प्राणी पक्षी
जनावरांचे तापमान(फॅरानाईट मध्ये)
1.   कोंबडी
105 ते 109
2.   शेळी
101 ते 103
3.   मेंढी
100 ते 103
4.   गाई
101 ते 101.5
5.   मैस
99  ते 101
6.   कुत्रा
100 ते 102
7.   माणूस
98.4 ते 98.6
         

Comments

Popular posts from this blog

सुतार कामातील हत्यारांची ओळख

प्लायवूड वर सनमायका चीत्कावने.